“भीमाशंकर’कडून अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

मंचर -पारगाव-दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारकान्याकडून गाळप हंगाम 2017-18 मधील गाळप उसास अंतिम हप्ता 100 रुपये प्रति मेट्रिक टन बॅंकेत वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दि. 21/09/2018च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे सन 2017-18 हंगामात गाळप केलेल्या गाळप ऊसास अंतिम हप्ता 100 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे अंतिम हप्त्यापोटी 7 कोटी 33 लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग केले आहेत. राज्यात इतर कारखाने सभासद, बिगर सभासद व गेटकेन ऊस पुरवठादारांना वेगवेगळा ऊस दर देतात.कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली. गाळप केलेल्या उसास प्रथम हप्ता 2 हजार 500 रुपये प्रति मेट्रिक टन व दुसरा हप्ता 100 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एकूण 2 हजार 600 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे 190 कोटी 57 लाख रुपये यापूर्वीच ऊस उत्पादकांना अदा केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.