नैकता बेन्स व इमा राडकानू यांच्यात अंतिम लढत

पुणे: डेक्कन जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000 डॉलरच्या महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स, इमा राडकानू यांनी अनुक्रमे थायलंडच्या पेंगतार्न प्लिपूच व रशियाच्या ओल्गा दोरोशिना यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुहेरीत नॉर्वेच्या उलरीके एकेरी व रशियाच्या याशीना एकतेरिना या जोडीने विजेतेपद पटकावले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स हिने थायलंडच्या आठव्या मानांकित पेंगतार्न प्लिपुच हिचा 2-6, 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 2तास 23 मिनिटे झालेल्या या संघर्षपूर्ण लढतीत पहिल्या सेटमध्ये प्लिपुचने बेन्सची चौथ्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये बेन्सने 4-3 अशी स्थिती असताना आठव्या गेममध्ये प्लिपुचची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली.

तिसऱ्या सेटमध्ये सामना 4-4 असा बरोबरीत सुरु असताना बेन्सने नवव्या गेममध्ये प्लिपुचची सर्व्हिस रोखली व 5-4 अशी आघाडी घेतली. पण शेवटच्या क्षणी बेन्सला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले व हा सेट 6-4असा जिंकला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवली.

Leave A Reply

Your email address will not be published.