सोशलमीडियावर आफ्रिदी झाला ट्रोल
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याला पाचवी मुलगी झाली. त्याने आपल्या मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विटरवर ट्विट केला. आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत असे शाहीदने म्हटले आहे. मात्र सोशल मीडियावर त्याची नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.
The Almighty’s infinite blessings & mercy are upon me…already having been granted 4 wonderful daughters I have now been blessed with a 5th, Alhamdulillah. Sharing this good news with my well-wishers… #FourbecomeFive pic.twitter.com/Yb4ikjghGC
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) February 14, 2020
अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार मुली आहेत. आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो शेअर करतो आहे. पाचवीही मुलगी झाल्याचा मला आनंद होतो आहे. माझ्या चाहत्यांना ही बातमी मी फोटोद्वारे देतो आहे. #FourbecomeFive असंही त्याने लिहिले आहे. तसंच आपल्या मुलींसोबतचा फोटो शाहीदने ट्विटरवर शेअर केला आहे.
12 तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोला 5 हजारांवर रिट्विट्स मिळाले आहेत. तर 40 हजारांपेक्षा जास्त लाईक्सही आले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी शाहीद आफ्रिदीला सल्ले देत त्याच्यावर टीका केली आहे. ट्विटर इंडियावरही Afrdi हा ट्रेंड चांगलाच चालतो आहे.