पुणे – दिवाळी आणि छटपूजेनिमित्त मूळ गावी किंवा पर्यटनासाठी पुण्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. या गाड्यांना वर्षाअखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांतून उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. यामध्ये उत्तरेकडे जाणाऱ्या सर्वाधिक गाड्यांचा समावेश आहे. बहुतांश गाड्यांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
पुणे-बरौनी एक्स्प्रेस- 27 डिसेंबर, पुणे- मंडुआडिह- 28 डिसेंबर, पुणे-लखनौ-29 डिसेंबर, पुणे-गोरखपूर, बरौनी-पुणे एक्स्प्रेस- 30 डिसेंबर, मंडुआडिह-पुणे, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस- 31 डिसेंबरपर्यंत, लखनौ-पुणे, गोरखपूर-पुणे, एलटीटी (कुर्ला)-चेन्नई- 1 जानेवारी, दरभंगा-पुणे, चेन्नई- एलटीटी (कुर्ला), भुवनेश्वर- एलटीटी (कुर्ला) – 2 जानेवारी, गोरखपूर-पुणे, एलटीटी (कुर्ला) -भुवनेश्वर या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.