“त्या’ कर्मचाऱ्यांना महासंघाचा पाठिंबा

टीका होत असतानाही निलंबन;आढावा समितीच्या निर्णयाचे समर्थन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 16 सेवानिलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निलंबन आढावा सामितीच्या शिफारशीवरून हे कारवाई पुन्हा महापालिका सेवेत रुजू होणार आहेत. गंभीर आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर चौफेर टीका होत असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे समर्थन केले आहे.

महापालिका सेवेतील 16 कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई, शिस्तभंग, फौजदारी कारवाई अशा कोणत्याही एका स्वरुपातील कारवाईमुळे महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याची संधी दिली आहे. या निर्णयावरून महापालिकेत चांगलेच वादंग पेटले आहे. याबाबत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी कर्मचाऱ्यांच्या दोषारोपांची चौकशी सुरू असतानाच निलंबनकाळात रुजू होण्याच्या बाबीचे समर्थन केले आहे.

राज्य सरकारच्या सेवा नियमाला धरूनच कर्मचाऱ्यांना सेवा निलंबित काळातही पुन्हा कामावर घेण्याची संधी देण्यात आली आहे. एखाद्या दोषारोपाची चौकशी सुरू असल्याने, संबंधित बाबीत या कर्मचाऱ्याने हस्तक्षेप अथवा पुरावा नष्ट करु नये, यासाठी निलंबनाची कारवाई केली जाते. चौकशीत दोषी आढळल्यानंतर होणारी शिक्षा महत्वाची आहे. त्यामुळेच हे कर्मचारी सेवेत रुजू झाले असले, तरी देखील त्यांच्याकडून दोषारोपांबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होऊ नये, म्हणून त्यांना अकार्यकारी पदावर अन्य विभागात बदली देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.