एफडीएची करडी नजर राहणार

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मिठाई, खाद्यतेल, खवा, तूप अशा खाद्यपदार्थांची तपासणी सुरू केली आहे.

शहरातील विविध भागातील दुकानात शंकास्पद वाटणाऱ्या पदार्थांची पाहणी केली. या दुकानातील पदार्थांचे नमूने घेऊन ते राज्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मिठाईयुक्त पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या काळात मागणी जास्त असल्याने विक्रेत्यांकडून नफा कमवण्याच्या उद्देशाने भेसळीचे प्रकार घडतात.

Leave A Reply

Your email address will not be published.