“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”! सरकारवरील ‘त्या’ टीकेनंतर अनुपम खेर यांची सारवासारव

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी कडक टीका सरकारचे कट्टर समर्थक अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतीच केली होती. त्यांनी केलेल्या टीकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. टीकेत त्यांनी इमेजपेक्षा सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असे म्हटत मोदी सरकारला चांगलेच सुनावले. दरम्यान, हे प्रकरण होऊन एक दिवस झाला असेल पण आज अचानक अनुपम यांनी एका कवितेतून आपल्या टीकेची सारवासारव करताना दिसले.

आज अनुपम यांनी सहा ओळींची एक कविता पोस्ट केली.
‘गलती उन्हीं से होती है
जो काम करते है
निकम्मों की जिंदगी तो
दुसरों की बुराई खोजने में ही खत्म हो जाती है,’
असे ट्विट त्यांनी केले. त्यांच्या या ट्विटनंतर त्यांनी सरकारवर केलेल्या टीकेवरून सारवासारव करत असल्याचे दिसत आहेत.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते. कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, त्यामुळे नातेवाइकांची होणारी घालमेल, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याचा उघडकीस आलेला प्रकार या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर अनुपम यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते केवळ असंवेदनशील व्यक्तीच अशा घटनांनी हेलावणार नाही. कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देणे ही घटना भीषण आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकीय स्वाथार्साठी वापर करणे हेदेखील अयोग्य आहे. सध्या इमेज नाही तर लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असे अनुपम म्हणाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.