बोल्ड फोटोवरून दिशाचे वडील रागावले

दिशा पाटणी नेहमीच आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत असते. या फोटोंवर तिच्या आई-वडिलांची रिऍक्‍शन काय असते, हे अलिकडेच दिशाने सांगितले आहे. आपले फॅमिली मेंबर्स खूपच “कूल माईंडेड’ आहेत. त्यांचे काहीच “ऑब्जेक्‍शन’ नसते. पण काही फोटोंवरून वडीलांना तीव्र आक्षेप होता, असे दिशाने सांगितले.

दिशाला टिव्हीमध्ये बघताना मात्र त्यांनी कधीच काहीही आक्षेप घेतलेला नाही. पण हॉट फोटो सोशल मिडीयावर शेअर करणे किंवा हॉटस ऍपवर शेअर करण्यावर त्यांचा तीव्र आक्षेप आहे. इन्स्टाग्रामवरच्या तिच्या काही फोटोंमुळे तिला फॅन्सनी ट्रोल देखील केले आहे. ऐन दिवाळीच्यावेळेसही तिने असाच विचित्र पेहरावातला फोटो शेअर केला होता. त्यावरून फॅन्सनी तिला “कपडे घालायला विसरलीस का ?’ अशा शब्दात ट्रोल केले होते.

याशिवाय नव्या गेटअपमधील फोटो शेअर करून फॅन्सकडून प्रतिक्रिया मिळवणे हा दिशाचा आवडीचा छंद आहे. पण तिच्या वडिलांना तिचे हे वागणे अजिबात आवडत नाही. अर्थात या सगळ्यामुळे दिशाला काहीही फरक पडलेला नाही. या ट्रोलिंगचा तिने कधीच त्रास करून घेतलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.