लखनौ – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यामुळे 586 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत.
त्यातील 55 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्या जागांपैकी तब्बल 38 जागा भाजपने मागील निवडणुकीत जिंकल्या होत्या. सपने 15, तर कॉंग्रेसने 2 जागा मिळवल्या. एकूण 7 टप्प्यांत होणाऱ्या यावेळच्या उत्तरप्रदेश निवडणुकीला अटीतटीच्या लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला 58 मतदारसंघांमध्ये 62 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये मिळून उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या 113 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.