रोम – इटालियन सीरीज ए फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात एसी मिलानच्या राफेल लेओ याने सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 6 व्या सेंकदाला स्पर्धेतील सर्वात वेगवान गोल नोंदवला. सासुओलोच्या सामन्यात राफेलने केलेला हा गोल इटलीतील देशांतर्गत लीग स्पर्धेतील सर्वात कमी वेळेत झालेला गोल आहे.
स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या एसी मिलानच्या राफेलने सामना सुरू होताच हकन कलांगोग्लुच्या पासवर हा गोल करून विक्रम साकार केला.
राफेल लेओने पोर्तुगालच्या पाओलो पोगीचा आठ सेकंदाचा विक्रम मोडला. पोगीने 2001 साली फियोरेंटीनाविरुद्ध आठ सेकंदात गोल केला होता. या सामन्यात एसी मिलानने 2-1 असा विजय मिळवला.