चिंबळी – चाकण (ता. खेड) येथील राणुबाई मळ्यातील शेतकरी शरद लेंडघर यांच्या शेतातील वस्तीजवळ एका मोराच्या मागे कुत्री लागली होती. त्या मोराचे प्राण शेतकरी शरद लेंडघर यांनी वाचवले आहेत.
यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी मनोहर (बापू) शेवकरी, विशाल बारवकर, नारायण करपे यांना फोनद्वारे कल्पना दिली. त्यांनी जखमी मोरावर उपचार करून त्याला येथील वनाधिकारी इंदलकर आणि गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
वाचवलेल्या त्या मोरास चाकण वनपरीक्षेत्रात रोटाई तळ्याच्या परिसरात मोरांच्या वास्तव्यात सोडण्यात आले आहे. विशाल बारवकर, शरद लेंडघर, हितेश घुगरे, अक्षय घुमटकर आदी उपस्थित होते.