बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’चा ट्रेलर रिलीज

फर्स्ट लुक पासून उत्सुकता वाढवलेल्या अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अमेय वाघ म्हणजेच नचिकेत प्रधान सिंगल असल्याने अत्यंत भावूक झालेला दिसतो. आपल्याला गर्लफ्रेंड का मिळत नाही? याचा विचार करण्याचा सल्ला नचिकेतला त्याचे मित्र-मैत्रिणी देतात, तर नचिकेतचा बॉस नचिकेतला गर्लफ्रेंड नसल्यामुळे त्याची चेष्टा करत उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत असल्याचे दिसते. नचिकेतची आई त्याला थेट विचारते, तुला मुलं आवडतात का? अशा घटनांमुळे नचिकेतच्या मनात गर्लफ्रेंड नसल्याबद्दलची खंत अधिक वाढीस लागते. दरम्यान, नचिकेत बरोबर पावसाच्या सरींमध्ये भिजताना मोहक दिसणारी अलिशा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर दिसते. त्यामुळे आजवर सिंगल असणाऱ्या नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळाली? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा ‘गर्लफ्रेंड’ च्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.