श्रीलंकेतील 200 कट्टरवाद्यांची हकालपट्टी

कोलोंबो – श्रीलंकेमध्ये इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर तब्बल 600 विदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामध्ये 200 कट्टर इस्लामी धर्मगुरुंचाही समावेश आहे. हे कट्ट्रर इस्लामी धर्मगुरु देशात कायदेशीरपणे जरी आले असले तरी त्यांनी व्हिसाची मुदत उलटून गेल्यानंतरही श्रीलंकेमध्ये वास्तव्य केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. मुदतीनंतरच्या वास्तव्यासाठी या सर्वांना दंड ठोठावण्यात आला असून देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे, असे श्रीलंकेचे गृह मंत्री वजिरा अबेयावर्देना यांनी सांगितले.

देशातील सध्याची परिस्थिती पाहता व्हिसा प्रणालीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यातूनच धार्मिक शिक्षकांसाठी व्हिसा प्रणाली अधिक कडक करण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे 200 धार्मिक कट्टरवाद्यांना देशाबाहेर घालवले आहे. इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे एक स्थानिक इस्लामी धर्मगुरुचा हात अहे. त्याने भारतातही प्रवास केला आणि तेथील जिहादेंशी संबंध वाढवले आहेत, असे अबेयावर्देना यांनी सांगितले. ज्यांना देशाबाहेर घालवण्यात आले आहे, त्यांच्या देशांची माहिती अबेयावर्देना यांनी दिली नाही. मात्र त्यामध्ये

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.