पुणे – शहरात घरफोड्यांचे प्रकार वाढत असून चोरटे हाताला लागतील त्या किंमती वस्तू चोरत आहेत. चोरीच्या अशाच एका घटनेत चोरट्यांनी घरातील पिग्गी बॉक्सही चोरले.
यामध्ये फिर्यादीच्या मुलांनी नाण्याच्या स्वरुपात एक हजाराची रक्कम साचवली होती. याप्रकरणी सॅलीसबरी पार्क येथे रहाणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला कुटूंबासह तीन ते चार दिवस घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी चोरटयांनी घराचे कुलूप तोडून, कडी कोयंडा उचकटून तसेच घराची चौकट वाकवून आत प्रवेश केला.
घरातील 2500 रुपयांची घड्याळे, एक हजाराची नाणी असलेला पिग्गी बॉक्स आणी गाडीची चावी असा साडेतीन हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे करत आहेत.