थायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी

बॅंकॉक : थायलंडचे राजा महा वजिरलॉन्गकोर्न यांनी आपली पत्नी राणी सीनीत वोंगवजीरापाकडी यांना आपल्या सर्व राज्याध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. यासह राणी सीनीत यांना देण्यात आलेल्या सर्वच सुविधाही मागे घेण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे आहेत. राजाच्या या निर्णयाची थाई राजवाड्यात याची घोषणा करण्यात आली.

थायलंडच्या राजाने राणी राणी सीनीत वोंगवजीरापाकडी यांच्याविषयी कठोर पाऊल उचलले आहे. राणीला सीनीत वोंगवजीरापाकडी यांना सर्व पदांवरून हटवण्यामागे राणीने रचलेले कट कारस्थान असल्याचे बोलले जात आहे. सीनीत वोंगवजीरापाकडी यांनी राजा महा वजिरलोंगकोर्न आणि पट्टराणी सुतीदा यांच्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुनच त्यांना सर्वच राजपदावरुन दूर करण्यात आले आहे.

तीन वर्षांपूर्वी थायलंडच्या सिंहासनावर राजा वजीरॉन्गकोर्न विराजमान झाले होते. 66 वर्षीय राजा वजीरॉन्गकोर्न यांचे यावर्षी मे महिन्यात चौथे लग्न त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाचे उपप्रमुख सुतिदा वजीरलॉंगकोर्न यांच्याशी झाले. लग्नाआधी सुतीदा थाई एअरवेजमधील फ्लाइट अटेंडंट होती. राजा महा वजिरलॉंगकोर्नशी लग्नानंतर तिला राणीची पदवी मिळाली.

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)