पाकिस्तानी संरक्षण दलांकडून दहशतवाद्यांना मिळाली स्फोटके

नवी दिल्ली -पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आरडीएक्‍स स्फोटके वापरण्यात आली. लष्कराकडे ज्या दर्जाचे आरडीएक्‍स असते. त्या दर्जाची आरडीएक्‍स या स्फोटासाठी वापरण्यात आली. पाकिस्तानी संरक्षण दलांकडून दहशतवाद्यांना ही स्फोटके मिळाली, असा निष्कर्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी काढला आहे. जैशच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवण्यासाठी मारुती इको व्हॅनचा वापर केला असेही फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले.

घटनास्थळाला भेट दिल्यानंतर आपल्या प्राथमिक अहवालात स्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्‍स महिन्याभरापूर्वी भारतात आणले असावे. स्फोटाच्या स्थळापासून पाच ते सात किलोमीटरच्या आत आरडीएक्‍सची जोडणी करण्यात आली, असा फॉरेन्सिक तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला आहे.

स्फोटानंतर पाऊस झाला. त्यामुळे महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले. आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. 50 ते 70 किलो आरडीएक्‍स वापरण्यात आले असावे. 100 ते 300 किलो आरडीएक्‍स असते तर जास्त नुकसान झाले असते.

Leave A Reply

Your email address will not be published.