मोबाईलचा स्फोट होऊन तरुणाचा डोळा निकामी

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर – मोबाईलवर गेम खेळताना मोबाईल गरम होउन स्फोट झाला, आणि मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने डोळाच निकामी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कागल तालुक्‍यातील उंदरवाडी येथील अमोल दत्तात्रय पाटील ( वय 16) हा दोन मोबाईलवर गेम खेळत बसला होता. बराच वेळ गेम खेळत बसल्याने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. या मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने अमोलचा डोळाच निकामी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोलने सरवडे येथील खोराटे विद्यालयातून 10 वीची परीक्षा दिली आहे. त्याचा लवकरच निकाल लागणार आहे. हुशार अमोलला पालकांनी जादा क्‍लाससाठी के.पी.पाटील शैक्षणिक संकुलात दाखल केले आहे. बुधवारी घरातील सर्वजण भैरीचे पठार येथे शेतीकामासाठी गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास अमोलने जनावरांना वैरण घातली आणि तेथेच मोबाईलवर गेम खेळत बसला. थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि स्फोट झाला, तेव्हा त्या मोबाईल मधील एक लांब तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला. वेदना होत झाल्याने शेजारील लोकांनी वडिलांना कळवले. वडील शेतातून आल्यावर अमोलला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील नेत्ररोग तज्ञांनी तत्काळ शस्रक्रिया करुन तो तुकडा काढला, मात्र डोळा निकामी झाल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)