हॉंगकॉंगवरून युरोपिय संघाने चीनला फटकारले

जिनिव्हा – हॉंगकॉंगच्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय चीनने तातडीने मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी युरोपिय संघाने केली आहे. या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवणे म्हणजे हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेला मोठा फटका आहे, असे युरोपिय संघाने म्हटले आहे.

चीनकडून घेतल्या गेलेल्या ताज्या निर्णयामुळे “एक देश, दोन व्यवस्था’ या तत्त्वानुसार हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे हॉंगकॉंगमधील राजकीय वैविध्य आणि मतस्वातंत्र्यासंदर्भातील ताज्या घडामोडींना आणखी तीव्र धक्का बसला आहे, असे असे युरोपियन संघाने एका निवेदनात म्हटले आहे.

अमेरिका, कॅनडा, मेक्‍सिको, ब्रिटन आदी युरोपातील प्रमुख देशांच्या प्रमुख नेत्यांनीही चीनच्या या एकतर्फी निर्णयाचा निषेध केला असून हॉंगकॉंगच्या मतस्वातंत्र्याचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीवादी चार लोकप्रतिनिधींना चीनने अपात्र ठरव्ल्याच्याअ निषेधार्थ हॉंगकॉंगमधील सर्वच्या सर्व 12 लोकप्रतिनिधींनी हॉंगकॉंगच्या विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.