लंडन – बुंदेसलीगा स्पर्धेला सुरुवात होण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता इंग्लंडमधील सर्वात मानाच्या इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल (ईपीएल) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना देखील येत्या 1 जुनपासून सुरुवात होणार आहे.
करोनाचा प्रसार वाढल्याने आयोजकांना ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. इंग्लंडमध्ये देखील करोनाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा सुरु करण्यावर सहभागी संघांचे एकमत होत नव्हते. या स्पर्धेतील अनेक सामने करोनामुळे पुढे ढकलण्यात आले होते.
इंग्लंडमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असून त्यामुळेच आयोजकांना ही स्पर्धा व त्यातील सामने सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. आयोजक व सर्व संलग्न संघांनी सरकारकडे विनंती केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळला आहे.