मुंबई – लॉकडाऊनमुळे रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, विष्णू पुराण, देवांचे देव महादेव आणि श्री गणेश या पौराणिक मालिकांचे छोट्या पडद्यावर पुनरागम झाले. दरम्यान, आता या मालिकांनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ओम नमः शिवाय’ ही प्रसिद्ध मालिका 23 वर्षांनी कलर्स वाहिनीवर प्रसारीत होणार आहे.
यासाठी कलर्सने आपल्या ऑफिशल इंस्टाग्राम हँडलवर ‘ओम नमः शिवाय’ चे टीजर प्रसारित केले आहे. यामध्ये ‘ओम नमः शिवाय’ ही मालिका भगवान शिवच्या गौरवमय आणि चिरंतन जीवनाचा उत्सव साकारणारी एक महाकथा आहे.
View this post on Instagram
Goonjegi poore brahmaand mein Shiv tatwa ki awaaz! 😍 #OmNamahShivaay jald hi, sirf #Colors par!
1997 मध्ये धीरज कुमार निर्मित ‘ओम नमः शिवाय’ या मालिकेत अध्यात्म, देवत्व आणि शक्ती यांचे वर्णन केले आहे. आता लॉकडाऊनमुळे ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.