सुदाममधील इस्लामी राजवट संपुष्टात

देशाची आता लोकशाही राजवटीच्या दिशेने वाटचाल 

खार्टूम – आफ्रिका खंडातील सर्वात हिंसाचारग्रस्त देश म्हणूनओळखल्या  जाणाऱ्या सुदानमधील इस्लामी राजवट अखेर संपुष्टात अली असून या देशाची वाटचाल आता लोकशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. सुदानमध्ये  जवळजवळ वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर तीस वर्षे अस्तित्वात असलेली इस्लामी राजवट संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे सुदान  सरकारने आता धर्म आणि सरकार एकमेकांपासून विलग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात सुदानचे  पंतप्रधान अब्दुल अहमद आणि सुदान पीपल्स लिबरेशन मोमेंटचे  नेते अब्दुल अजी यांच्यामध्ये इथिओपियाची राजधानी एडिस अबाबा  येथे एका करारावर सही करण्यात आली. सुदानमध्ये धर्म आणि सरकार एकमेकांपासून वेगळे करण्यात आले असून सर्व नागरिकांचे हक्क आता निश्चित करण्यात येतील असे या करारात म्हणण्यात आले आहे.

1989मध्ये उमर  बशीर यांनी  सुदानमध्ये सत्ता मिळवली होती त्यानंतर देशांमध्ये इस्लामी राजवट सुरू झाली होती. अनेक भागांमध्ये शरीयत कायदा लागू करण्यात आला होता यानंतर सुदानला  आंतरराष्ट्रीय पातळीवर बहिष्काराला ही सामोरे जावे लागले होते. नंतर गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये देशात सत्तापालट झाल्यानंतर इस्लामी राजवट संपून लोकशाही मार्ग स्वीकारण्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर वर्षभर अनेक घडामोडी घडल्या हिंसक आंदोलने झाली त्या नंतर अखेर या इस्लामी राजवटीला पूर्णविराम मिळाला आहे. आता आगामी काळात देशात  लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.