Pune Ganpati Visarjan | पुण्यात गणपती विसर्जनची मिरवणूक अखेर संपली आहे. अलका चौकात गणेश उत्सव मिरवणूकीची सांगता झाली आहे. भवानी पेठ मधील महाराष्ट्र मित्र मंडळ यांचा शेवटचा गणपती येथून मार्गस्थ झाला आहे. शहरात अनंत चतुर्थदशीनिमित्त मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आता संपली आहे. 189 गणेश मंडळे अलका चौकातून गेली आहेत. यंदाची मिरवणूक 28 तास 25 मिनिटे सुरू होती. तर 2023 मध्ये 28 वाजून 40 मिनिटांनी मिरवणूकीची सांगता झाली होती.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील 3 वाजता मिरवणूक संपल्या असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी 8 हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. पोलिस देखील मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत होते. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात होते.
दरम्यान, शांततेत गणेशोत्सव पार पडला त्याबद्दल सर्व मंडळ आणि भक्तांचे अमितेश कुमार यांनी आभार व्यक्त केले. तसेच लेजरवर पूर्णपणे बंदी होती ज्या ठिकाणी लेजर लाईट सुरू होती त्या ठिकाणी कारवाई करणार असून आवाज मर्यादे संदर्भात देखील डेसीबील मोजण्याच्या मशीन होत्या, त्यात पाहून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.