पुणे -मुळा-मुठा आणि इंद्रायणी नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पाहणीसाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची पाहणी रखडलेली होती. मात्र, याला मुहुर्त मिळाला असून बुधवारी (दि.21) सकाळी ही पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी दिली.
नदीपात्रातील अतिक्रमणे रोखण्याबाबत ऍड. सारंग यादवाडकर आणि विवेक वेलणकर यांनी याचिका दाखल केल्या आहेत. यावर सुनावणी करत न्यायाधिकरणाने “तज्ज्ञ समिती नेमून नदीपात्रातील अतिक्रमणांची पाहणी करावी आणि त्याचा अहवाल
6 आठवड्यांत द्यावा,’ असे आदेश दिले होते. या समितीमध्ये केंद्रीय आणि मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त या सर्वांचा समावेश आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ यामध्ये “नोडल एजन्सी’ असेल.