मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.
त्यांचा या ट्विटला हजारो युजर्स तसेच सर्व सामान्य चाहत्यांंपासून ते नेते मंडळी, कलाकार, क्रिकेटपटूंनीही ट्विट करत प्रार्थना केले आहेत.
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
‘शहंशाह’ कोरोनाची ‘दिवार’ तोडून ‘अग्निपथावर’ मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील, अशा आशयाचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
महानायक अमिताभ बच्चन जी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, “शहेनशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 11, 2020
तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्विट करत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. ‘महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनी त्यांना असलेल्या लक्षणांच्या आधारे कोरोना चाचणी केली, या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ते दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत… त्यांची प्रकृती स्थिर आहे. असं ते म्हणाले.
महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते मुंबई येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. #AmitabhBachchan pic.twitter.com/CYS7U5NxmU
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 11, 2020
We all wish and pray for your speedy recovery!
Get well soon @SrBachchan ji ! https://t.co/RX8FrWWDx9— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2020
We all wish you for your fast recovery @SrBachchan ji.#GetWellSoon https://t.co/TorSDZWNaT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 12, 2020