मुंबई – करोनाबाबतचा वाईट अनुभव मराठी अभिनेता पुष्कर जोग याने सोशल मीडियावर शेअर केला. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो अत्यंत भावुक झाला आहे.
पुष्करच्या मामाचे निधन झाले आहे. मामाने त्याला एक दिवस आधी फोन केला होता. मात्र, पुष्कर फोन घेऊ न शकल्याने त्याचे आणि पुष्करचे बोलणे होऊ शकले नाही.
View this post on Instagram
दुसऱ्या दिवशी मामा गेल्याची दु:खद बातमी पुष्करला कळली आणि पुष्कर हादरून गेला. मी काल मामाला कॉल बॅक केला असता तर आमचे बोलणे होऊ शकले असते, असे पुष्करने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
पुष्करने भावुक होऊन सर्वांना आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्या, आता मेसेस नकोय त्यांना फोन करा, जवळच्या माणसांची विचारपूस करा, असे भावनिक आवाहन पुष्करने त्याच्या चाहत्यांना केले आहे.