मुंबई : येथील चार पंचतारांकित हॉटेल बॉम्बने उडवण्याच्या धमकी देणारे इमेल आल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल लीला, हॉटेल सी प्रिन्सेस, दि पार्क आणि रामादा इन यांना लष्कर ए तय्यबाच्या नावाने आलेल्या इमेलमधून बॉम्बने उडवण्याची धमकी आल्या आहेत.
हे स्फोट घडवायचे नसतील यर 100 बिटाकॉईन देण्याची मागणी केली. ही माहिती समजल्यावर पोलिसांनी या हॉटेल्सची कसून तपासणी केली. त्यात कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळून आली नाहीत.
पोलिसांकडून तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बॉम्बनाशक पथक आणि श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीला गांभीर्याने घेतले असून आयपी ऍड्रेसच्या सहाय्याने इमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.