टाकवे बुद्रुक – टाकवे येथील ट्रान्सफार्मर जळाल्याने सोमवारी (दि. 22) सायंकाळपासून निम्मे टाकवे गाव अंधारात गेले आहे. टाकवे ग्रामपंचायत कार्यालय व टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील मुख्य वीजपुरवठा बंद असल्याने शासकीय त्याचबरोबर आरोग्य सेवा ही कोलमडली असल्याचे चित्र दिसून आले.
ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी उकाड्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. विजेच्या समस्येविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नवीन ट्रान्सफार्मर आण्यासाठी व्यवस्था केली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे महावितरण अभियंता विजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे.