राज्यात एकाच वेळी वीजबिलाची होळी

वाढीव वीजदराचा उद्योजकांच्या आमी संघटनेकडून निषेध

नगर – महाराष्ट्र राज्यातील सर्व उद्योजकांच्या संघटनांने एकाच दिवशी महावितरणने वाढीव वीजदरवाढीचा निषेध केला आहे. नगरमधील एमआयडीसीतील उद्योजकांच्या आमी संघटनेने या वाढीव वीजदरवाढीचा निषेध करून, तसे निवेदन एमआयडीसी विभागाचे महावितरण सहायक अभियंता यांना देऊन कार्यालयाबाहेर वीजबिलांची होळी केली आहे.

अशोक सोनवणे म्हणाले, “महावितरण कंपनीने 2016 च्या आदेशानुसार 2018 चे वीजदर निश्‍चित करत ते 2020पर्यंत कायम ठेवावेत, अशी उद्योजकांची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे महावितरणने दुर्लक्ष करीत उद्योजकांना वाढीव वीजबिले दिली आहेत.’ ही वीजबिले इतर राज्यांच्या तुलनेत 20 ते 35% अधिक आहेत. राज्य सरकारने स्वतः दिलेल्या जाहीर आश्‍वासनाप्रमाणे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर समप्रमाणात येईपर्यंत कोणतीही अतिरिक्त दरवाढ करू नये, अशी त्यांनी मागणी केली.

अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी महावितरण नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना व उद्योजकांना वेठीस धरीत आहे. इतर समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रामुख्याने वीजगळती रोखणे आवश्‍यक आहे. केडब्ल्यूएच प्रणालीनुसार बिलिंग पद्धत होती. यात उद्योजकांना पॉवर फॅक्‍टर इन्सेंटिव्ह 7% होता. केव्हीएच 2020 बिलिंग प्रणालीनुसार तो आता 3.5% करण्याचे घाटत आहे. यामध्ये उद्योजकांचे नुकसान होत आहे. वाढीव वीजदर 5% हून 7%पर्यंत करण्यात आल्याचे कटारिया म्हणाले. उद्योजकांच्या वीजबिलप्रश्‍नी राज्य सरकारने वा महावितरणने निर्णायक भूमिका घेणे आवश्‍यक आहे. वीजबिलप्रश्‍नी योग्य तोडगा न काढल्यास राज्यभरातील उद्योजकांच्या संघटना एकत्रित येऊन यापुढील काळात बिले भरणार नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)