कॉंग्रेस अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर

कार्यसमितीची बैठक 22 जुलैनंतर

नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याचा मुहुर्त आणखी लांबणीवर ढकलण्यात आला आहे. कॉंग्रेस कार्यसमितीची बैठक 22 जुलैनंतर होणार असल्याची चर्चा कॉंग्रेसमध्ये सुरू झाली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देवून 50 दिवस लोटले आहेत. तरीसुध्दा, कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्षाची निवड अद्याप होवू शकली नाही. कॉंग्रेस कार्यसमितीची बैठक आज मंगळवारी होणार होती. मात्र आता ती 22 जुलैनंतर होणार असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर ही बैठक होवू शकते. महत्वाचे म्हणजे, राहुल गांधी यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी चारचार नावे सुचविण्यास सांगितले होते. तरीसुध्दा, नवीन अध्यक्षाची निवड होवू शकली नाही. एखाद्या नावावर एकमत न झाल्यास ज्येष्ठ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जावू शकते, असे सूत्राचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here