मोदींचा कार्यक्रम दाखविल्याने निवडणूक आयोगाची ‘डीडी न्यूज’ला नोटीस

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस बजावली असतानाच पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला राष्ट्रीय न्यूज ब्रॉडकास्टर्सने केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला डीडी न्यूज आणि डीडीच्या इतर क्षेत्रीय वाहिन्यांवरुन सर्वाधिक कव्हरेज देण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच डीडी न्यूज आणि डीडीच्या इतर क्षेत्रीय वाहिन्यांवरुन सर्वाधिक कव्हरेज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय न्यूज ब्रॉडकास्टर्सने शुक्रवारी निवडणूक आयोगाला दिली आहे. डीडी न्यूज आणि डीडीच्या इतर क्षेत्रीय वाहिन्यांवरुन सर्वाधिक कव्हरेज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला तसेच दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाला कव्हरेज देण्यात आलेला आहे.

मात्र सरकारी सूत्रांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले कि डीडी  न्युजने भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जास्त फायदा मिळावा असे कव्हरेज दिलेले नाही. तत्पूर्वी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या दूरदर्शनवर नरेंद्र मोदींची भाषणं ३१ मार्चला दोन तास सातत्याने दाखवण्यात आल्यामुळे आणि ‘मै भी चौकीदार’ मोहिमेवरून आरोपांनंतर निवडणूक आयोगाने या  मोहिमेवरून दूरदर्शनला नोटीस बजावली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.