निवडणूक आयोगाची न्यायालयात हमी
मुबई – मतदानादिवशी मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडला तर तातडीने बैद्याकिय सेवा मिळावी म्हणून निवडणूक केंद्रावर ऍम्बूलन्सची अथवा गाडीची जेथे शक्य असेल तेथे सेवा पुरविली जाईल, अशी हमी निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिली. निवडणूक केंद्रावर कार्यरत असलेले कर्मचारी अथवा वैद्यकिय गरज भासल्यास निवडणूक केंद्रावर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश द्या. अशी विनंती करणारी जनहित याचिका ऍड.दीपक चट्टोपाध्याय यांनी दाखल केली आहे. त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने ही हमी दिली.
गेल्यावर्षी एका निवडणूक केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका आला होता. परंतू त्याला वैद्यकिय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या पुर्वीही असे प्रकार काही मतदान केंद्रांवर घडलेले असल्याने प्रत्येक केंद्रावर ऍम्ब्युलन्स ठेवण्यात यावी. तसे आदेश निवडणुक आयोगाला देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती.