पाटसच्या सरपंचपदी खडके यांची निवड

वरवंड – पाटस (ता. दौंड ) येथील सरपंच पदाची निवडणूक आज (दि. 24) पाटस ग्रापंचायत कार्यालयात पार पडली असून, या निवडणुकीत संभाजी खडके यांचा विजय झाला.

पाटस गावच्या सरपंच वैजयंता म्हस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटस गावच्या सरपंचपदाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत सरपंचपदासाठी दीपक भंडलकर, संभाजी खडके आणि रेखा ठवरे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र वेळेतच रेखा ठवरे यांनी सरपंचपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे संभाजी खडके विरुद्ध दीपक भंडलकर अशी ही लढत झाली. या निवडणुकीत संभाजी खडके यांना 11 मते पडली, तर दीपक भंडलकर याना 5 मते पडली आहेत. या लढतीत संभाजी खडके यांचा विजय झाला, तर एक मत बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी दिली. पाटस गावचे नवनिर्वाचित सरपंच संभाजी खडके हे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत.
या निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक राहुल यादव, हवालदार बाळासाहेब पानसरे, घनश्‍याम चव्हाण आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.