मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. अशातच शिवसेनेचे लढवैय्ये नेते संजय राऊत यांना ED ने समन्स बजावले आहेत. काल दिनांक 27 रोजी संजय राऊत यांना ED ची नोटीस आल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करीत दिली होती. आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ED कडून सांगण्यात आले होते. मात्र अलिबाग येथे नियोजित सभा असल्यामुळे आज चौकशीसाठी हजार राहता येणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
ED grants Shiv Sena MP Sanjay Raut more time to appear in money laundering case
Read @ANI Story: https://t.co/gpdnjCJccU#SanjayRaut #ED #moneylaundering pic.twitter.com/C15lX4stzp
— ANI Digital (@ani_digital) June 28, 2022
ईडीने वेळ वाढवून दिली
मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचे वकील आज ईडी च्या कार्यालयात हजर झाले होते. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊतांचे वकील विकास यांनी सांगितले की, ईडीने काल संजय राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र, ते संजय राऊत यांना खूप उशिराने मिळाले. ईडीने काही कागदपत्रही मागवले होते. मात्र, इतक्या कमी वेळात ही कागदपत्र जमा करणे कठीण होते. त्यामुळे आम्ही ईडीकडे वेळ मागितला. यासाठी ईडीने वेळ वाढवून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार आता ईडीने संजय राऊत यांना 1 जुलैला चौकशीसाठी बोलावलं आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडी ने समन्स बाजवले आहेत.