अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर – मोदी

नवी दिल्ली – अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असून 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केला. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारने नागरिकांना आणि उद्योगांना मदत करण्याबरोबरच कोळसा, शेती, कामगार, संरक्षण, नागरी विमान वाहतूक या क्षेत्रात आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम नेटाने राबविला आहे. त्याची फळे आपल्याला आगामी काळात मिळतील.

विविध क्षेत्रांना योग्य वेळी योग्य ते पॅकेज देण्यात आले आहे. आगामी काळात गरज पडल्यास आर्थिक मदतीची शक्‍यता खुली ठेवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.