अफगाणिस्तानातील खासगी उद्योगापुढे आर्थिक संकट ; गोठवलेला निधी खुला करण्याचे अमेरिकेला आवाहन

काबूल – अफगाणिस्तानातील खासगी उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून अमेरिकेने गोठवलेला निधी तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी तेथील खासगी उद्योगांनी केली आहे. अफगाणिस्तान चेबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इन्व्हेस्टमेंट, अफगाणिस्तान चेंबर ऑफ माईन्स ओऍओन्ड इंडस्ट्रीने एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.

 मानवतेच्या कारणास्तव अमेरिकेने जर गोठवलेला निधी तातडीने खुला केला नाही तर अफगाणिस्तानातील उद्योग कोसळेल, अशी शक्‍यता या संस्थांनी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानातील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करावे. तसेच अफगाणमधील नागरिकांसाठीची मानवता विषयक मदतही करावी, असेही आवाहन या संस्थांनी केले आहे.

गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानातील उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बॅंकांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारही थांबले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर अफगाणमधील खासगी उद्योगापुढे मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, असेही या उद्योग विषयक संस्थांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पूर्वच्या अफगाणच्या कंत्राटदारांनी अब्जावधी डॉलरचे कर्ज घेतलेले आहे. जर ही कर्जाची परतफेड वेळेवर झाली नाही तर मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो. राजकीय संकटावर राजकीय तोडगा काढला जाऊ शकेल. परंतू त्यासाठी उद्योगांना वेठीस धरले जाऊ शकत नाही, असेही या उद्योगांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.