देशाची आर्थिक स्थिती आणि करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी; अर्थमंत्र्यांनी बोलावली बैठक

नवी दिल्ली  – देशाची आर्थिक स्थिती आणि करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी या विषयी चर्चा करून आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी एफएसडीसी म्हणजेच फायनान्शीअल स्टॅबिलिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे.

या आर्थिक वर्षातील एफएसडीसी ची ही पहिली बैठक आहे. या आधी 15 डिसेंबर 2020 ला या कौन्सिलची बैठक झाली होती. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. देशाच्या अर्थकारणात सध्या रिकव्हरीचे संकेत मिळू लागले आहेत.

चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 20 टक्‍क्‍यांच्या आसपास राहील असा अदांज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत भारताचा विकास दर उणे 24.4 इतका राहिला होता. केंद्र सरकारने अलिकडेच सरकारी मालत्तांच्या मॉनिटायझेशनचा प्रस्ताव मांडला आहे. त्या अनुषंगानेही या बैठकीत आढावा घेतला जाईल असे सांगण्यात येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.