नवी दिल्ली – या महिन्यापासून देशातील काही क्रीडा स्पर्धा तसेच सराव शिबिरे सुरू होतील व परिस्थिती पाहून त्यातील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची चाचपणीही केली जाईल, असे विधान केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी केले होते. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने प्रेक्षकांना प्रवेश देण्याच्या विचारांचे विधान त्यांच्यावरच उलटले आहे.
स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी कधी देता येईल हे सांगणे कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 21 सप्टेंबरपासून 100 प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची तयारी दर्शविण्यात येत होती.