नागपूर – नानागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली होती. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली होते. यातच आता मुंढे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, आपल्या करोनाचा चाचणीने निकाल निगेटीव्ह आला आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Way to Recovery
Today my #Covid_19 result is Negative. Positivity of Covid needs to be fought with Positivity of thought & action. Strong will power, focused & collective efforts will overcome the crisis. Collective Societal actions required for a better future, including health pic.twitter.com/kziun7Q1fQ— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 6, 2020
दरम्यान, मुंढे यांनी ट्विट केले आहे की , “आज माझा कोवीड १९ चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. करोना पॉझिटिव्ह असल्यावर त्याचा सामना पॉझिटिव्ह विचार आणि कृतीने केला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, निश्चय आणि एकत्रितपणे काम केल्यास या संकटावर विजय मिळतवा येईल. उज्वल भविष्यासाठी सामाजाने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. यामध्ये आरोग्याविषय समस्यांचाही समावेश होतो,” असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे.