कोंढव्यातील घटना, भिक मागून जगत होती महिला
पुणे: दुपारच्या वेळी रस्त्याच्या कडेला झाडाखाली झोपलेल्या फिरस्त्या महिलेच्या डोक्यावर डंपरचे चाक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा खुर्द परिसरात महापालिकेच्या अशोक कचरा डेपोच्या प्रवेशव्दारासमोर गुरूवारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी डंपरचालकास अटक केली आहे.
सुनिल प्रल्हाद रायबोले (वय ३४, रा. होमी प्लाझा, कात्रज) असे अटक केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. पोलीस शिपाई सैफनमुलुक नदाफ यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.