दुबईतील कंपनीने भारतासाठी सुरू केले ऑक्‍सिजन कंटेनर निर्मितीचे काम

दुबई – येथील एका सीएनजी सिलिंडर्स तयार करणाऱ्या कंपनीने आपले हे काम थांबवून भारतासाठी ऑक्‍सिजन कंटेनर्स तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. भारतात निर्माण झालेली ऑक्‍सिजनची अभूतपूर्व टंचाई लक्षात घेऊन भारताला मदत करण्यासाठी कंपनीने हा विधायक निर्णय घेतला आहे. ईकेसी इंटरनॅशनल असे या कंपनीचे नाव असून, ती एका भारतीय कंपनीचीच उपकंपनी आहे.

आमचे भारतासाठीचे कर्तव्य लक्षात घेऊन आम्ही हे काम हाती घेतले आहे, असे कंपनीचे दुबईतील व्यवस्थापकीय संचालक पुष्कर खुराना यांनी सांगितले. ही कंपनी भारतातील एव्हरेस्ट कांतो सिलिंडर्स लि. कंपनी या कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीने मे महिन्यातच भारताला सहा हजार ऑक्‍सिजन सिलिंडर्स पाठवले आहेत. अजूनही एक हजार सिलिंडर्स त्यांनी तयार केले आहेत. भारताची गरज लक्षात घेऊन आम्ही तातडीने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.