पुणे – गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरू असलेल्या डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार आहे. तेथील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंदक कायदा (prevenntion oh money laundering act) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. येथून प्रकरण वर्ग करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला.
डीएसके प्रकरणात सुमारे 35 हजार गुंतवणूकदारांची अकराशे कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके), पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. येथील न्यायालयात गुंतवणूकदारांची फसवणूक (mpid) कायद्यानुसार सुनावणी सुरू होती. आता मुंबईत एमपीआयडी आणि ईडी दोन्ही प्रकरणांची सुनावणी मुंबईत सुरू राहणार आहे.