मुंबई – मद्यधुंद तरूणीने ओला ड्रायव्हरला शिवीगाळ केल्याचा आणि पोलिस कर्मचाऱ्यावरही हात उचलत त्यांची गच्ची पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन मद्यधुंद तरूणींवर कारवाई करण्याची मागणी ओला ड्रायव्हरने केली आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तरूणींच्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसत आहेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. व्हिडीओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे.
या मद्यधुंद तरुणींनी केलेला उपद्याप आणि घातलेला हैदोस गंभीर आहे. मुंबई पोलिसांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जातेच कशी, इतकी हिंम्मत येते कुठून, मुंबईसाठी जागणाऱ्या, कोणत्याही वेळी धावून येणाऱ्या पोलिसांसोबत अशा पद्धतीने गच्ची पकडण्याची केलीली हिम्मत आता मुंबईकरांच्याही डोक्यात गेली आहे. या तिन्ही गैरवर्तन करणाऱ्या तरुणींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.