दारू आणून दिली नाही म्हणून चालकाला मारहाण

शिक्रापुरात एकावर गुन्हा

शिक्रापूर (पुणे) – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे वाहन चालकाला दारू आणण्यास सांगितले. त्यावेळी त्याने नकार दिल्याने गाडी मालकाने चालकाला बेदम मारहाण केली. याबाबत एकनाथ आनंद गावळे याने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी सागर अशोक सांडभोर (रा. सांडभोरनगर, शिक्रापूर ता. शिरूर) याला अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सागर सांडभोर यांचा पाण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या पाण्याच्या गाडीवर एकनाथ गावळे चालक म्हणून काम करतो. (दि. 15) सप्टेंबर रोजी चालक एकनाथ हा गाडीत पाणी भरत होता.

मालक सागर हा त्याच्या किराणा दुकानामध्ये दारू पीत बसलेला होता. त्यावेळी सागरने एकनाथला दारू आणून देण्यासाठी सांगितले. त्यावेळी एकनाथने मी गाडीवर कामाला आहे, मी माझे काम करेल, दारू आणून देणार नाही, असे सांगितले. यावेळी सागरने एकनाथला शिवीगाळ करत त्याचे डोके आपटून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक अनिल जगताप व निखील रावडे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.