बस चालवताना ड्रायव्हरला हार्ट ऍटॅक… पुढे काय घडले?

मुंबई – बस सुरू… ड्रायव्हरला हार्ट ऍटॅक… बस सिग्नलला धडकली… बसमधील प्रवासी घाबरले… ही चित्तथरारक घटना मुंबईत आज घडली.

बेस्टची एक बस चालवताना ड्रायव्हरला अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस चेंबूरमधील एका ट्रॅफिक सिग्नलला धडकली. मात्र चमत्कार असा झाला की, बसमधील प्रवाशांना गंभीर इजा झाली नाही.

या बस चालकाचे नाव हरिदास पाटील असून त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस घाटकोपर डेपोतील असून चेंबूरकडे जात होती.

सध्या करोनाच्या पार्श्‍वभूमीवर या बसमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासहीत एकूण 9 प्रवासी प्रवास करीत होते. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने आणि बस ट्रॅफिक सिग्नलला धडकल्याने हे प्रवासी घाबरले. मात्र या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही. या बसमधील पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून त्वरित पोलीस व्हॅन बोलावली आणि ड्रायव्हरला रूग्णालयात दाखल केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.