Accident News – बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ भरधाव एसटीने पोलीस भरतीची तयारी करणा-या ५ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (१९ जाने.) सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट घोडके (१९) आणि ओम घोडके (२०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर इतर दोघांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडवरून परभणीकडे प्रवासी घेऊन जाणा-या एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना उडवले. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले.
मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, एसटी महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.