दुहेरी किंमत धोरणाला केंद्राकडून हिरवा कंदील

पुणे – साखरेचे घसरणारे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरविण्याची मागणीला आता केंद्र सरकारने प्रतिसाद दिला आहे. नुकतेच पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचे सूत्र ठरविण्याच्यासाठीच्या सूचना अन्न मंत्रालयाला दिल्या आहेत.

घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे दर वेगवेगळे ठरविण्यासाठी सूत्र तयार करण्यात येणार आहे. या दुहेरी दर धोरणात औद्योगिक वापरासाठीचे साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असतील, यामुळे संकटातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देऊ शकत नाहीत.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या म्हणण्यानुसार साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे बॅंकांकडे साखर गहाण ठेवून त्यावर व्याज देण्यापासून कारखान्यांनी सुटका होण्यास मदत होईल. 60 ते 70 टक्‍के साखर जर जास्त दराने विकली तरी कारखान्यांना कॅश फ्लो वाढून त्यांना बॅंकाकडे जाण्याची गरज पडणार नाही कारखाने स्वत: त्यांचा निधी उभारू शकतील.

दुसरीकडे साखरेच दुहेरी दर धोरण ही संकल्पना ऐकायला सोंपी वाटत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि परीक्षण करताना मोठी जटीलता निर्माण होईल व्यापाऱ्यांनी घरगुती वापराच्या दराने साखरे खरेदी करून औद्योगिक दराने विकल्यास तेव्हा तुम्ही काय करणार असे साखर कारखान्याच्या सुत्रीनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.