पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. पाणलोट क्षेत्राच्या कोयना, नवजा, महाबळेश्‍वर याठिकाणी गेल्या चोवीस तासात पावसाने उघडीप दिल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे बुधवारी रात्री उघडण्यात आलेले कोयना धरणाचे दरवाजे गुरूवारी सकाळी बंद करण्यात आले. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे ओढे-नाल,े छोट्या नद्यांमधूून धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरूच आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

सध्या कोयना धरणात दोन हजार 100 क्‍युसेक पाण्याची आवक होत असून धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 104.60 टीएमसी असून धरणात येणाऱ्या पाण्याचा वापर पायथा गृहातून वीजनिर्मितीसाठी केला जात आहे. बुधवारी रात्री तीन फुटांवर असणारे धरणाचे दरवाजे दोन फुटांवर स्थिर करण्यात आले तर पावसाचा जोर सकाळपासून कमी असल्याने दोन फुटावर असणारे कोयना धरणाचे दरवाजे सकाळी सहा वाजता एक फुटांवर करण्यात आले. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजता कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येऊन कोयना नदीत होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.