केवळ गाढवांची छाती ५६ इंचाची असते – काँग्रेस नेता  

नवी दिल्ली – केवळ गाढवांची छाती ५६ इंचाची असते, अशी टीका गुजरातचे काँग्रेस नेते यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

अर्जुन मोढवाडिया यांनी म्हंटले कि, एका आरोग्यदायी व्यक्तीची छाती  २६ इंच असू शकते तर बॉडीबिल्डर व्यक्तींची छाती ४२ इंच असते. केवळ गाढवांचीच छाती ५६ इंच असते. आणि बैलांची १०० इंच असते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यावरून आता नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप प्रवक्ते भरत पंड्या यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटले कि, या वक्तव्याने सिध्द होते कि, पराभवाच्या भीतीमुळे काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या अपमानजनक वक्तव्याचे उत्तर आम्ही निवडणुकीत देऊ, असेही ते म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.