सातव्या दिवशी 7118 मूर्तींचे दान

अभिनेत्री गिरिजा प्रभू यांचा सहभाग

पिंपरी – संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गणेश मूर्तीदान उपक्रमात सातव्या दिवशी 7 हजार 118 गणेश मूर्तींचे भाविकांनी दान केले.

चिंचवड-थेरगाव पूल घाटावरील गणपतीदान उपक्रमात मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने स्वत: तीन तास सहभाग घेतला. “”मूर्तीदान हा स्त्युत्य उपक्रम आहे. मी व माझे कुटुंबीय त्यामध्ये सहभागी राहू”, असे तिने स्पष्ट केले. शहरातील विविध घाटांवरून एकूण सहा टन निर्माल्य जमा करण्यात आले. गणेश मूर्तीदान उपक्रमाला सातव्या दिवशी मिळालेला प्रतिसाद : थेरगाव पुल घाट – घरगुती गणपती – 5623, मंडळांच्या मूर्ती -20, हौदातील मूर्ती – 25 रावेत -150, दिघी – 800, केशवनगर – 25, गणेश तलाव (प्राधिकरण) – 150 मोरवाडी – 325.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.