शिरूर : शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने कोविड सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस निघाल्याने खळबळ उडाली आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे कोविड सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे निष्पन्न होऊन आठ दिवस झालेले असतानाच आता शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने कोविड सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे समोर आले असून प्रशासनाने त्या ठिकाणी छापा टाकत हॉस्पिटल चालक डॉक्टर सह चौघांना ताब्यात घेतले आहे.
येथे अनेक रुग्ण उपचार घेत असून त्यांना इतर ठिकाणी हलविण्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे, मात्र शिरूर तालुक्यात अशा प्रकारे एकामागे एक अनेक घडत असल्याने खळबळ उडाली आहे.